You can write your reviews and post comments here.

 • Home
  Home This is where you can find all the blog posts throughout the site.
 • Categories
  Categories Displays a list of categories from this blog.
 • Tags
  Tags Displays a list of tags that has been used in the blog.
 • Bloggers
  Bloggers Search for your favorite blogger from this site.
 • Team Blogs
  Team Blogs Find your favorite team blogs here.
 • Login

पर्यावरण कट्टा

First Sunday Every Month, 9.30 AM to !0.30 AM at DattaKashi Hospital, Devi Chowk, Satara

Posted by on in पर्यावरण कट्टा

Raanwata announces " Paryavaran Katta " -- a open forum - Vyaaspeeth for all environmentalist and nature lovers every month 1'st Sunday (7'th April , this month) at 9.30 AM to 10.30 AM at Dattakashi Hospital OPD. This will include all sorts of conservation efforts like Reading of Gatiman Santulan, audiovisuals, lectures, slideshows, films, felicitations of well done persons, etc. etc,....! Everybody is welcome.

     

पर्यावरण कट्टा ७ एप्रिल रोजी अत्यंत उत्साहात सुरु झाला. सविस्तर अहवाल थोड्याच काळात  छायाचीत्रांसाहित ठेवण्यात येईल. 

सविस्तर अहवाल 

रानवाटा मंडळ

रानवाटा मंडळातर्फे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळात पर्यावरण कट्टा हा एक अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरले. त्या निमित्ताने रविवारी दि ७ एप्रिल  २०१३  रोजी सकाळी दत्तकाशी रुग्णालय, देवी चौक, सातारा येथे पहिला कट्टा संपन्नझाला.

DSC02881fb.jpgकार्यवाह सौ रागिणी जोशी  यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. या कट्ट्याचे प्रयोजन आणि संकल्पना या विषयी डॉक्टर संदीप श्रोत्री यांनीबोलताना पर्यावरणाविषयी सर्व काही असे या उपक्रमाचे अद्भुत आणि अभिनव स्वरूप असल्याचे सांगितले. सध्या पर्यावरणाविषयी खूप जण काही करत असतात. त्यांना मोकळेपणे बोलता यावे यासाठी हे एक मुक्त व्यासपीठ आहे. सर्व निसर्गप्रेमींना ते खुले आहे.DSC02884fb.jpg व्यासपीठ म्हणाले कि थोडा दबाव येतो, परंतु कट्टा हा प्रत्येकाला आपला वाटतो.आगदी लहानापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वाना सहभागी होता यावे म्हणून हा प्रपंच आहे.  प्रत्येकाला आपला अनुभव, कृती  किंवा विचार बोलता येईल. कोणीही प्रमुख पाहुणा अथवा विशेष निमंत्रित असणार नाही हे डॉक्टर श्रोत्री यांनी स्पष्ट केले. ढोबळ मानाने पुढील काही नियम प्रत्येक सभासदाने पाळणे गरजेचे आहे.   १- एका व्यक्तीने ५ मिनिटापेक्षा जास्त बोलायचे नाही.

 

२- कोणताही मुद्दा पुन्हा पुन्हा सांगायचा नाही. 

३- laptop, lcd प्रोजेक्टर आणि speakers येथे तयार असतील. Pendrive किंवा CD आणाव्यात. 

 ४- शक्यतो पूर्व कल्पना द्यावी 

 

संपूर्ण कार्यक्रम १ ते दीड तास चालेल. त्याची विभागणी अंदाजे पुढील प्रमाणे असेल. 

१- पर्यावरणाविषयी    गतमहीन्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी (५ मि.)

२- पर्यावरणविषयक कायदे (५ मि.)

३- सभासदाची  अनुकरणीय व अभिनंदनिय कृती (१० मि)

४- येण्याऱ्या महिन्यातील स आणि उत्सव यांच्या बद्दल पर्यावरणीय जन जागृती ची चर्चा (१५ मि)

५- जैवविविधता - एका  वनस्पती ची माहिती  (५ मि.)

६- जैवविविधता - एका प्राण्याची   माहिती  (५ मि.)

७- निसर्गविषयक विडीओ  (५ मी )

८- श्री दिलीप कुलकर्णी संपादित गतिमान संतुलन या मासिक पत्रिकेचे वाचन (१०  मी)

९- निसर्ग आणि पर्यावरणाविषयी काव्य निबंध नाट्य संगीत (१० मि)

१० - निसर्ग आणि पर्यावरणाविषयी पुस्तक परिचय  (१० मि)

       या पर्यावरण  कट्ट्याचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे उपवन सरंक्षक श्री. एन आर प्रवीण यांनी रानवाटा चे  कार्यकारिणी सदस्य श्री विशाल देशपांडे आणि धैर्यशील दयाळ यांचे फुल देऊन केले. ते म्हणाले, निसर्गाने सातारा जिल्ह्याला मोठे योगदान दिले आहे. येथे मोठी जैव विविधता पाहायला मिळते जिल्ह्यामध्ये पश्चिमेला महाबळेश्वर आणि पूर्वेला माण  तालुका असा फार मोठा निसर्गाचा विरोधाभास आहे. हा कट्टा या सर्व विविधतेला प्राधान्य देईल, असा उपक्रम मी प्रथमच ऐकतो आहे, माझ्या आणि वन खात्यातर्फे सर्व प्रकारचे सहाय्य दिले जाईल. DSC02893fb.jpg

रानवाटा चे अध्यक्ष श्री जयंत देशपांडे या कट्ट्या मध्ये कोण कोण सामील होऊ शकेल ते सांगितले.  भारतीय संस्कृती मध्ये निसर्गाला अनुसरून ऋतुमानानुसार सन साजरे केले जातात. त्याचे पर्यावरणीय महत्व या कट्ट्यावरून ठसवले जाइल. 

रानवाटा चे  कार्यकारिणी सदस्य श्री विशाल देशपांडेयानी Trapdoor  spider या कोळ्याच्या संशोधनाविषयी फोटोसहीत माहिती   सांगितली कास पठारावर फुलांच्या जोडीला इतर भरपूर जैवविविधता आहे.DSC02891fb.jpg Trapdoor  Spider या  डायनासोर कालखंडातील कोळया विषयी संशोधन सुरु आहे. हा जमिनीमध्ये  बिळं  करून राहतो. शेताच्या   तालीमध्ये दार असलेले याच घर असते . त्यातच एक नवीन प्रजाती सापडली. तिचे नाव कासेन्सीस असे ठेवले आहे. या कोळ्याच्या माद्या  वर्षभर सापडतात परंतु नर कोळी माद्यांकडून मिलन झाल्यानंतर लगेच खाल्ले जातात त्यामुळे नर सापडणे कठीण असते. 

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ  हे त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने भ्रमणध्वनीवरून या कट्ट्या मध्ये सामील झाले. इतराना पर्यावरण संवर्धनासाठी प्रवृत्त करण्यास या कट्ट्याचा उपयोग होळी असे ते म्हणाले. असे  कट्टे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरु करायला हवेत. सद्ध्या राज्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न भेडसावतो आहे. सार्वजनिक आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. मागील वर्षी सातारा जिल्ह्याचे  कल्लेक्टर मा. डॉ. रामास्वामी यांनी पाण्याच्या नियोजनाबाबत काही संस्था, व्यक्ती यांचे विचार ऐकले होते. त्यानुसार तळी, आड, विहरी यांचे पुनुरुज्जीवन  करण्याचे ठरले. गोडोली तळ्यातील गाळ काढून तो मोकळा केल्यास कोटी कोटी लिटर्स  पाणी साठवता येइल. हि संकल्पना प्रत्यक्षात आली आहे, त्यामध्ये  मा. डॉ. रामास्वामी, श्री श्याम देशपांडे, नगरपालिकेचे श्री दत्तात्रय बनकर यांचे सहकार्य लाभले शिवाय सामान्य नागरिकांनी सुद्धा  मोलाचा सहभाग घेतला. ड्रेनेज पाईप लाईन वळून तळ्या बाहेरून घेतलि. शासनाने साडेनऊ लाख रुपयांचा निधी दिला आहे. 

        धैर्यशील दयाळ याने अनेक वेळा मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांची, सापांची सुटका केली आहे. त्याचा सत्कार यावेळी करण्यात आला.DSC02892fbss.jpgतो म्हणाला वाघासारख्या मोठ्ठ्या प्राण्यांना च महत्व न देता सर्व लहान मोठ्या जीवांकडे लक्ष्य  द्यायला हवे. पतंगाच्या मांजामध्ये पक्षी अडकतात, तो मांजा साध्या दोराचा हवा, पर्यावरणप्रेमी असायला हवा. 

         श्री. सदाशिव जाधव हे या कट्ट्यामध्ये सामील होण्यासाठी भुईंज या गावातून आले होते. त्यांचे वणवा या विषयवारील  २५२   कवितांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यांनी त्यातील तीन कवितांचे वाचन केले. ते म्हणाले निसर्ग राहिलाच नाही तर संवर्धन कशाचे करायचे? वणवा लाऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत 

 

डॉ. संदीप श्रोत्री यांनी सरूपता या विषयावरील एका रंग बदलणाऱ्या सरड्याची चित्रफित दाखवली. 

रानवाटा तर्फे दुकाने शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी तयार केलेली प्रबोधनपर  पोस्टर्स चे प्रकाशन दैनिक ऐक्य चे संपादक श्री. वासूदेव  कुलकर्णी आणि श्री. प्रवीण यांचे हस्ते झाले. DSC02904fb.jpg

रानवाटा चे श्री. मिलिंद हळबे यांनी आभार मानले आणि समारोप झाला.

0